ग्रामपंचायत तरंगफळ व तालुका विधी सेवा समिती माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

स्वराज्य वार्ता टीम,युवराज नरुटे

तरंगफळ ता माळशिरस येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत तरंगफळ व तालुका विधी सेवा समिती माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. न्यायमूर्ती पी. पी.कुलकर्णी होते ।त्यांनी कायदेविषयक मार्गदर्शन या विषयावर बोलताना सांगितले की गुन्हे हे दोन प्रकारात येतात एक म्हणजे जामीनपात्र गुन्हा व दुसरा अजामीनपात्र गुन्हा . या पहिल्या गुन्हा हा जामीनपत्र गुन्ह्यामध्ये गुन्हेगाराला जामीन घेण्याचा अधिकार आहे तो अधिकार कोणताही अधिकारी अडवू शकत नाही. तर दुसरा अजामीनपात्र गुन्ह्या याध्ये काही गुन्हे असे आहेत की याला जामीन मिळवता येत नाही. पण याविषयी मोफत मार्गदर्शन तालुका विधी सेवा समिती करत असते, अश्या प्रकारे त्यांनी अनेक कायदेशीर बाबीवर मार्गदर्शन केले.

ऍड. शांतीलाल तरंगे यांनी कौटुंबिक हिंसाचार या विषयावर मार्गदर्शन केले , त्यामध्ये त्यांनी कुटुंबातील महिलांवर होणाऱ्या हिंसा व त्यावर उपाय याविषयवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि प प्रा शाळा तरंगफळ चे मुख्याध्यापक महादेव शेटे यांनी केले, आभार प्रदर्शन ग्रामसेवक संतोष पानसरे भाऊसाहेब यांनी केले.

यावेळी उपस्थित  ऍड झंजे, ऍड गोरवे, ऍड शांतीलाल तरंगे, बिट अंमलदार परांडे, विस्तार अधिकारी खरात साहेब, सरपंच ज्ञानेश्वर कांबळे, डेप्युटी शिवाजी वाघमोडे, ग्रा सदस्य बापू गोरड,  अपंग संस्थेचे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख जानकर , मा सरपंच महादेव तरंगे, सुजित तरंगे , मधुकर तरंगे, बापू तरंगे ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम सिद्धनाथ मंदिरात व कोरोनाच्या सर्व नियम अटी पळून पार पडला, हे चौथे मार्गदर्शन शिबिर होते.

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !