काँग्रेस जिल्हाअध्यक्ष डाॅ.धवलसिंहांच्या मॅरेथॉन बैठका सर्व तालुक्यांचा आढावा,नियोजनाचा श्रीगणेशा.!

सोलापूर,स्वराज्य वार्ता टीम


सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी,नेते आणि कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित केली आहे.बुधवार ते शुक्रवार असे सलग तीन दिवस ते मॅरेथॉन बैठका सोलापुरच्या कॉंग्रेस भवनात होणार आहेत.अशी माहिती काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डाॅ धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे.


आगामी जिल्हा परिषद,पंचायत समित्या आणि विविध सहकारी संस्थाच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणून कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा निर्धार आणि नियोजन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीत मार्गदर्शन व सूचना करण्यात येणार आहे.

नवी कार्यकारिणी तयार करण्यासाठी तसेच शहर व तालुका अध्यक्ष नेमण्यासाठी सक्रीय कार्यकर्त्यांची चाचपणी केली जाणार आहे.त्यानंतर मुलाखती घेऊनच संधी दिली जाणार आहे.

गट – गणात विभाग प्रमुख

कोणालाही वशिला आणि शिफारशीनुसार पदे न देता त्यांचे संघटन,कौशल्य,कार्यक्षमता,आणि पक्षनिष्ठा याचे मुल्यमापन करूनच यापुढे नियुक्ती दिली जाणार आहेत.कामाची विभागणी करून त्या- त्या भागातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात सुध्दा विभाग प्रमुख नेमले जातील अशीही संकल्पना आहे.

पक्षप्रवेश आणि जबाबदारी

जिल्ह्यातील अनेक संघटना आणि ईतर पक्षातील प्रभावी नेते तसेच कार्यकर्ते काँग्रेस पक्षात येण्यास ईच्छुक आहेत,त्यांना सन्मानपूर्वक प्रवेश देऊन पक्षवाढीसाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार आहे. लवकरच जिल्हा अध्यक्षांचा तालुका निहाय ग्राणीण दौरा आयोजित करण्यात येणार असून या बैठकीत त्याचेही नियोजन ठरविण्यात येणार आहे.विशेषतः तरुण वर्गाला पक्षसंघटनेत संधी आणि जबाबदारी देण्याची भूमिका आहे.

काॅग्रेस भवनात तालुका निहाय बैठका

● बुधवार दि -15 /09/2021रोजी
उत्तर सोलापूर – ( सकाळी 10 ते 12 ), दक्षिण सोलापूर – ( दुपारी 12 ते 2 ), अक्कलकोट – ( दुपारी- 2 ते 4 ), बारशी ( दुपारी – 4 ते 6 ).

गुरुवार दि – 16/09/2021 रोजी

मोहोळ – ( सकाळी 10 ते 12 ), मंगळवेढा ( दुपारी 12 ते 2 ), पंढरपूर -( दुपारी 2 ते 4 ), सांगोला – ( दुपारी 4 ते 6 ).

● शुक्रवार दि.17/09/21 रोजी ,
करमाळा – ( सकाळी 10 ते 12 ), माढा – ( दुपारी 12 ते 2 ), पंढरपूर -( दुपारी 2 ते 4 ), माळशिरस – ( दुपारी 4 ते 6 ).

या वेळापत्रकाप्रमाणे कॉंग्रेस भवन,सोलापूर येथे सर्व तालुक्यातील पक्षाचे प्रमुख नेते,आणि कार्यकर्ते,आजी माजी पदाधिकारी,सर्व सेलचे कार्यकारीणी,जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,आदींची बैठक होणार आहे.या महत्वाच्या आढावा तसेच नियोजन बैठकीला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे…!

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !