मित्रत्वाच्या सामन्यात मैत्री विजयी श्री अर्धनारीनटेश्वर क्रिकेट क्लबच्या खेळाडूनी घेतला खेळाचा मनमुराद आनंद

वेळापूर / प्रतिनिधी – येथील श्री अर्धनारीनटेश्वर क्रिकेट क्लबच्या २५ वर्षानंतर प्रथमच भेटलेल्या मित्रांच्या मर्यादित षटकांच्या सामन्यात मैत्रीचा विजय झाला तर स्नेहभोजनाने या मित्रांनी आपला आनंद द्विगुणित केला .

ग्रामीण भागातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या वेळापूर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदानावर जानेवारी १९८५ पासून ते जानेवारी १९९९ पर्यंत दरवर्षी १ जानेवारी ते १० जानेवारी या काळात भव्य राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा भरायच्या . येथे खेळण्यासाठी राज्यातील रणजीपटूनीही हजेरी लावली होती . या स्पर्धा पाहण्यासाठी पुणे , सातारा , सोलापूर जिल्ह्यातील हजारो क्रिकेटप्रेमी हजेरी लावायचे . वेळापूर पंचक्रोशीतील लोक आपला कामधंदा सोडून क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यायचे . २० मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेने त्याकाळी सर्वानाच वेड लावले होते . येथे खेळायला येणारे खेळाडू हे बक्षिसासाठी नव्हे तर येथील स्पर्धेचे नियोजन व प्रेक्षकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद यामुळे स्पर्धेत भाग घ्यायचे . या स्पर्धेचे नेटके आयोजन श्री अर्धनारीनटेश्वर क्रिकेट क्लबचे खेळाडू करीत असत . १० जानेवारी १९९९ ला स्पर्धा संपल्या आणि प्रत्येक खेळाडू नोकरी , व्यवसायामुळे क्रिकेट पासून दुर गेला .
हे सर्व खेळाडू तब्बल २५ वर्षानंतर रविवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदानावर एकत्र आले आणि त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत खेळाचा आनंद लुटला . या खेळाडूमधील अनेक खेळाडू उच्चपदस्थ अधिकारी झाले तर अनेक खेळाडू उद्योगपती झाले . परंतु आपल्या पदाचा गर्व न करता हे खेळाडू मनसोक्त खेळले . दोन्ही संघांनी मर्यादीत दहा षटकात ९५ धावांचा पाऊस पाडला . प्रत्येकामध्ये तोच उत्साह , तीच उर्जा दिसून येत होती . खेळाच्या समाप्तीनंतर मित्र स्पोर्ट्सच्या वतीने श्री अर्धनारीनटेश्वर क्रिकेटक्लबच्या सर्व खेळाडुंचा सन्मान करण्यात आला . स्नेहभोजनानंतर प्रत्येक खेळाडुंनी एकमेकांचा भावनावश होत निरोप घेतला ते पुन्हा भेटण्याच्या अटीवर .

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !