शिवराज पुकळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित

जयंत पाटील साहेब यांच्याशी अंधारी बैठक; उत्तमराव जानकर यांचा हिरवा कंदील, पालकमंत्र्यांचा आशिर्वाद,


माळशिरस तालुक्यातील युवा नेते शिवराज पुकळे ऊर्फ भाऊसाहेब हे कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा माळशिरस तालुक्यात रंगली होती त्या चर्चेला आज पुर्णविराम मिळाला आहे.शिवराज पुकळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.

राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी चे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या सोबत शिवराज पुकळे यांची बैठक झाली तसेच सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते उत्तमराव जानकर यांनीही हिरवा कंदील दाखवला व प्रवेश निश्चित झाला.उत्तमराव जानकर यांनी सांगितले की बड्या नेत्यांच्या हस्ते प्रवेश सोहळा लवकरच होणार असल्याचे सांगितले.

पिलीव भागात शिवराज पुकळे युवाशक्ती च्या माध्यमातून शिवराज पुकळे यांनी समाजकार्याच्या माध्यमातून भरपूर समाज उपयोगी कामे केली आहेत तसेच युवकांची मोठी फळी त्यांच्या सोबत आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचा निश्चित फायदा होणार आहे त्यामुळे पिलीव भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.याचा फायदा कोणाला व तोटा कोणाला याचे गणित भल्या भल्या नेत्यांना करत बसावे लागनार आहे असे बोलले जात आहे.

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !