रमजान ईदच्या खरेदीसाठी दि.11 मे व 12 मे या दिवशी लाॅकडाऊन मध्ये मर्यादित वेळेत शिथीलता द्यावी:डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील


अकलूज,स्वराज्य वार्ता टीम
सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना चालू असून रमजान ईद 13 किंवा 14 तारखेला साजरी होणार आहे तरी रमजान ईद च्या खरेदीसाठी दि.11 मे व 12 मे या दिवशी लाॅकडाऊन मध्ये मर्यादित वेळेत शिथीलता द्यावी अशी मागणी डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी पालकमंत्री ना. दत्ता मामा भरणे व जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे इमेल द्वारे निवेदन देऊन मागणी केली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की असून सध्या कोरोना महामारीचे सकंट चालू असलेने शासनाने सोलापूर जिल्ह्यात कडक निर्बंध लावलेले आहेत. रमजान ईद हा मुस्लीम बांधवांचा महत्वाचा सण आहे परंतु शासनाने दिलेल्या आदेशानुसार मुस्लिम बांधव रमजान ईद सण घरीच साजरी करतील याची मला खात्री आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील मुस्लीम समाज हा अत्यंत गरीब असून बहुतांश लोकांचे हातावरचे पोट आहेत.त्यांचीही घरीच साजरी होणार आहे या अनुषंगाने सणाचे खरेदी करिता प्रशासन सोलापूर शहरासाठी 11मे व 12 मे तारखेला अशंत: लाॅकडाऊन मर्यादित कालावधीसाठी शिथील करणार असल्याचे कळते सदर सोलापूर शहरा प्रमाणेच ग्रामीण भागात सुद्धा दि.11 मे व 12 मे या तारखेला लाॅकडाऊन मध्ये मर्यादित वेळेची शिथीलता करावी.

असे न केलेस ग्रामीण भागावर अन्याय होणार आहे.म्हणून आपण ग्रामीण भागासाठी दि.11 मे व 12 मे या तारखेला लाॅकडाऊन मध्ये शिथीलता देऊन ग्रामीण भागातील मुस्लीम बाधंवाना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !