आईसारखी मायेची सावली देणारा निसर्ग ;मातृदिनानिमित्त युवकांनी केले वृक्षारोपण

पिलीव,स्वराज्य वार्ता टीम

आई म्हणजे मायेची ऊब, ममता,जिव्हाळा, जखमांवरचं औषध, मैत्रीण, अंगणातली तुळस, देवीचं रुप, यातना, सहनशीलता,समर्पण,आणि बरेच काही. कुठलंही काम असो वा अडचण आपण आधी आईला हाक मारतो. लागलं तरी तोंडून निघणारा पहिला शब्द आई गं असतो. आपल्या चुकांवर पांघरुन घालणं आणि वेळ प्रसंगी रागवणं हे देखील आईच करते. धाकही दाखवते आणि समजूनही घेते ती आईच असते.


जिवनात पहिले शिक्षण देते ती आई, तिच आयुष्यातील पहिली गुरु आहे. त्यामुळेच आईने दिलेली शिदोरी आयुष्यभर सरत नाही. आईनंतर खरे दातृत्व कुणाकडे असेल तर, मानवाच्या जन्मल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत कुठलाही भेद न करता नि:स्वार्थ भावनेने प्रत्येकास शुद्ध ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षाकडे आहे.आजच्या परिस्थिती मध्ये ऑक्सिजन चे महत्व सगळ्यांना माहीत आहे ऑक्सिजन विकत घ्या लागतो पण झाडे निस्वार्थपणे ऑक्सिजन देत असतात.त्यामुळे आई आणि झाडे यांच्यासारखी दातृत्व दुसरे कुणाकडेच शोधुन मिळणार नाही.


म्हणूनच मदर्स डे निमित्त आई प्रमाणेच निस्वार्थी पणे मनुष्याला सर्व गोष्टी देणारे झाड लावून युवा नेते शिवराज पुकळे,वखार महामंडळ अधिक्षक विशाल काळे साहेब, मेकॅनिकल इंजिनिअर रामभाऊ गलांडे यांनी मदर्स डे साजरा केला.

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !