रणजितदादांच्या वाढदिवसानिमित्त विहीरी व गाईगोठ्यांचे वाटप : सभापती साठे

अकलूज / प्रतिनिधी माळशिरस पंचायत समितीच्या वतीने भाजपाचे विधान परिषदेचे आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील १० लाभार्थीना विहीरीचे तर ७५ लाभार्थीना गाईगोठ्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सभापती शोभाताई साठे यांनी दिली .


माळशिरस पंचायत समितीच्या वतीने अहिल्यादेवी सिंचन योजने अंतर्गत तालुक्यातील १० लाभार्थीना प्रत्येकी ३ लाख रुपये प्रमाणे ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यातील ७५ लाभार्थीना प्रत्येकी ७७ हजार रुपये प्रमाणे ५७ लाख ८७ हजार ५२५ रुपये मंजूर करण्यात आले आहेत . आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे वाटप करण्यात आले आहे .


यापूर्वी तालुक्यातील ३० लाभार्थ्याना गाईगोठ्यासाठी २३ लाख १५ हजार तर ९१ लाभार्थ्याना विहीरीसाठी २ कोटी ७३ लाख रुपये देण्यात आल्याचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी दिली .


यावेळी माजी सभापती वैष्‍णवीदेवी मोहिते-पाटील , माजी उपसभापती किशोर सूळ, सदस्य प्रताप पाटील , गजानन एकतपुरे, मानसिंग मोहिते , नानासाहेब नाईकनवरे , अनिल जाधव , अर्जुन धाइंजे , रेणुका माने-देशमुख , ॲड.हसीना शेख ,हेमलता चांडोले , लतिका कोळेकर , विद्या वाघमोडे,
शोभा साठे व ताई महाडिक आदी उपस्थित होते .

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !