भिगवण परिसरातील कोरोना रुग्णांसाठी सचिन बोगावत ठरताहेत देवदुत

भिगवण

भिगवण परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये अनेक कुटुंबातील सर्वच नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याने, अनेक रुग्णांना उपचार मिळवताना अडचणी निर्माण होत आहेत. अशा अनेक रुग्णांसाठी सचिन बोगावत हे स्वताच्या व कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता देवदूताची भूमिका बजावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना मोठ्या प्रमाणात मानसिक आधार मिळत असल्याने कोरोना सारख्या गंभीर आजारातून बरे होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.

भिगवण व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा मिळणे अडचणीचे बनले आहे. अशा अडचणीत सापडलेल्या रुग्णांसाठी सचिन बोगावत हे फार मोठी मोलाची मदत करत आहेत. अशा रुग्णांना भिगवण कोविड सेंटरमध्ये बेड मिळवून देणे, ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे अशा रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे, ज्या रुग्णांना प्लाझ्माची गरज आहे अशा रुग्णांना वेगवेगळ्या ठिकाणाहून प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याचे काम देखील सचिन बोगावत करत आहेत.

निवडणुकीच्या वेळी मोठमोठी आश्वासने देणारे पुढारी नागरिकांना गरज असताना गायब झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशा वेळेस सचिन बोगावत हे जातीपातीचा, पक्षाचा विचार न करता कोरोना रुग्णांना कशाप्रकारे मदत करता येईल व त्यातून तो कसा बरा होईल या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करताना पाहावयास मिळत आहे. भिगवण येथील कोविड सेंटरमध्ये जास्तीत जास्त सुविधा कशा वाढवता येतील यासाठी सुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. कोरोना रुग्णांना केल्या जाणाऱ्या मदतीमुळे अनेक नागरिकांकडून बोगावत याचे आभार देखील मानले जात आहेत.

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !