स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरला रोटरी क्लब कडून मदत

भिगवण,स्वराज्य वार्ता टीम

रोटरी क्लब ऑफ भिगवण व रोटरी क्लब ऑफ कात्रज (पुणे ) यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील कोविड केअर सेंटरला फ्रिज व टेबल पंखे भेट देण्यात आल्याची माहिती रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर यांनी दिली. भिगवण रोटरी क्लबच्या वतीने कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक कोविड सेंटरला मोठ्या प्रमाणामध्ये मदतीचा हातभार लावला जात आहे.

यावेळी रोटरीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, डॉ. अपर्णा शिंदे, नानासाहेब मारकड, डॉ.अमोल खानावरे, संजय चौधरी, रियाज शेख, प्रदीप ताटे, कमलेश गांधी, संतोष सवाणे, औदुंबर हुलगे, तानाजी खटके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संपत बंडगर यांनी सांगितले की, राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने ठिकठिकाणी कोविड सेंटर उभे करुन रुग्णांना सेवा दिली जात आहे. या स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर मध्ये दिवसाला १५० च्या आसपास कोविड रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्यांच्या स्वॅब करीता फ्रीजची गरज लक्षात घेऊन भिगवण आणि कात्रज पुणे येथील रोटरीच्या वतीने फ्रिज आणि टेबल फॅन भेट देण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या कालावधीत आम्ही रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे संपत बंडगर यांनी यावेळी सांगितले.

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !