यामिनी पाटणकर राष्ट्रीय शोधनिबंध स्पर्धेत पश्चिम भारतात प्रथम

अकलूज / प्रतिनिधीयेथील जे . एम . म्हात्रे इंन्फ्रा प्रा . लि . कंपनीचे जनरल मॅनेजर दीपकसिंह पाटणकर यांची कन्या यामिनी पाटणकर हीने कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर वैधानिक मंडळ , भारत सरकार आयोजित शोधनिबंध स्पर्धेत पश्चिम भारत विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे .


यामिनी पाटणकर हीने मुंबईच्या भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या महाविद्यालयातून आर्किटेक्चर क्षेत्रातील पदवी प्राप्त केली असून तीने कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर वैधानिक मंडळ , भारत सरकार आयोजित राष्ट्रीय शोधनिबंध स्पर्धेत भाग घेतला होता . देशभरातील पाच विभागातून ५६० शोधनिबंध सादर करण्यात आले होते . त्यामधून प्रत्येक विभागातून दोन याप्रमाणे दहा उत्कृष्ट शोधनिबंधांची निवड करण्यात आली होती .


यामिनी पाटणकर हीने महाराष्ट्र – गुजरात या पश्चिम विभागातून ” छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतापगड एक इतिहासकालीन ठेवा ” या संदर्भात ” किल्ले प्रतापगडाचे संरक्षण आणि तेथे रहात असलेल्या व विविध कलाकौशल्य जपणाऱ्या लोकांचे संवर्धन ” या विषयावर शोधनिबंध सादर केला होता . या शोधनिबंधासाठी त्यांना प्रा . रितू देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते .


यामिनी पाटणकर ही सध्या मध्यप्रदेश राज्यातील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲन्ड आर्किटेक्चर शासकीय महाविद्यालय , भोपाळ येथे मास्टर इन आर्किटेक्चर कॉंझरवेशन या विषयातील पदवीत्तर ऑनलाईन शिक्षण घेत आहे . तीच्या या यशाबद्दल सर्वत्र तीचे कौतुक होत आहे .

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !