उजनी धरणातील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर उजनी धरणात वर्षात जमा होते साडेचार लाख दक्षलक्ष लिटर सांडपाणी

स्वराज्य वार्ता टीम/विशेष वृत्त

उजनी धरणातील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून या धरणातील पाच टीएमसी पाणी उचलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, तेवढे सांडपाणी अप्पर भीमा क्षेत्रातून जलाशयात वर्षभरातही साठत नाही. वर्षभरात ४ लाख ५२ हजार २३५ दशलक्ष लिटर सांडपाणी जमा होते, त्याच्या मोबदल्यात पाच टीएमसी पाणी उचलले जाणार आहे, ही सरळ सरळ लबाडी असून पालकमंत्री दत्तात्रय भरणे सांडपाण्याच्या नावावर उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी करीत असल्याचेच दिसून येत आहे .

पुणे शहरासह जिल्ह्यातील महानगरपालिका , नगर पालीका , नगर परिषदा , औद्योगिक शहरे व मोठ्या गावातून दरवर्षी सुमारे ४ लाख ५२ हजार २३५ दशलक्ष घनमीटर सांडपाणी उजनी जलाशयात येते . यातील काही सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. काही ठिकाणी मलनिःस्सारण योजना आहेत. लोकसंख्या वाढीनुसार पाणी पुरवठा आणि सांडपाणी निर्मिती थोडी वाढली असली तरी ती पाच टीएमसी होत नाही. तरीही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाच टीएमसी पाण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला आणि सोलापूरकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे .


उजनी धरणाच्या वरच्या बाजूस पुणे व पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिका, लोणावळा, तळेगाव, आळंदी, जुन्नर, शिरूर, सासवड, जेजुरी, दौंड, बारामती, इंदापूर या दहा नगरपालिका, देहू, खडकी, पुणे या तीन नागरी व सैनिकी वसाहतीची छावणी क्षेत्रे, नदीकाठची १९६ गावे आहेत. त्यात दौंड तालुक्यातील ३३ , हवेली तालुक्यातील ३५ , इंदापूर तालुक्यातील १९ , शिरूर तालुक्यातील ११ , मावळ तालुक्यातील ६३ , खेड तालुक्यातील ३५ गावांचा समावेश आहे. याखेरीज तळेगाव, चाकण, तळवडे, भोसरी, हिंजवडी, रांजणगाव, जेजुरी, बारामती व कुरकुंभ ही नऊ औद्योगिक क्षेत्रे आहेत. त्याचप्रमाणे सात स्वतंत्र उद्योग आहेत. या सर्व क्षेत्रातून सांडपाणी जमा होते. या पाण्याची आकडेवारी पाहिली तर आपल्याला नेमकं चित्र समजू शकेल.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला रोज होणा-या पाणीपुरवठ्यातून ९९९ एमएलडी (दशलक्ष लिटर) सांडपाणी तयार होते. नगरपालिका क्षेत्रातून रोज ४८ एमएलडी, छावणी क्षेत्रातून ३४ एमएलडी, नदीकाठच्या गावातून १६ एमएलडी, औद्योगिक क्षेत्रांतून ११२ एमएलडी, स्वतंत्र उद्योगातून २८ एमएलडी सांडपाणी निर्माण होते. या सगळ्याची बेरीज म्हणजे एकूण सांडपाणी १२३९ एमएलडी होते. वर्षभरात ४ लाख ५२ हजार २३५ दशलक्ष लिटर सांडपाणी जमा होते.
एक टीएमसी म्हणजे हजार दशलक्ष घनफूट. आकड्यात त्याची मांडणी १,०००,०००,००० अशी होते. आता दररोज जमा होणारे १२३९ एमएलडी सांडपाणी वर्षभराच्या गणितात (१२३९ X ३६५ ) ४ लाख ५२ हजार २३५ दशलक्ष लिटर होते. तेवढ्या सांडपाण्याच्या मोबदल्यात पाच टीएमसी पाणी उचलले जाणार आहे. ही एक प्रकारे पाण्याची चोरीच आहे.

सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्याची वरदायिनी असलेले उजनी धरण दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरतेच असे नाही .
दर तीन वर्षाने सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात . त्यात आता हा पाच टीएमसी पाण्याचा नवा वाद पुढे आला आहे . पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ही पाच टीएमसी पाण्याची योजना म्हणजे दुष्काळात तेरावा अशीच आहे .

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !