आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आमदारनिधीतून ४८ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन खरेदीसाठी ३८ लाख ४० हजाराचा निधी

अकलूज,स्वराज्य वार्ता टीम

माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत .ग्रामीण भागातील या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स उपलब्ध व्हावा म्हणून आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून ४८ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन खरेदीसाठी ३८ लाख ४० हजार रुपयांचा निधी दिला आहे .

आ मोहिते पाटील म्हणाले ,ग्रामीण भागातील रुग्णांना ऑक्सिजन बेड , व्हेंटीलेटर , रेमडेसिवीर इंजेक्शन आदी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत आहे . सोलापूर जिल्ह्यात आज अखेर ८ लाख ३७ हजार ४३३ नागरीकांची कोवीड तपासणी करण्यात आली आहे . त्यापैकी ७२ हजार ९६५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत . आज अखेर जिल्ह्यातील १ हजार ६०९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर १२ हजार ७६८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यातील खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत .


जिल्ह्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने कोरोना रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा म्हणून सुमारे एक लाख ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेता आहे . त्याच धर्तीवर आपणही आपल्या आमदार निधीतून सुमारे ४८ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे . त्याची किंमत सुमारे ३८ लाख ४० हजार रुपये असल्याचे ते म्हणाले . हे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन उप जिल्हा रुग्णालय अकलूजसाठी १३ , उपजिल्हा रुग्णालय करमाळासाठी ५ , जेउर ( ता . करमाळा ) साठी ५ , माढा तालुक्यातील टेंभुर्णी व मोडनिंबला १० , पंढरपूर तालुक्यातील करकंब व भाळवणीला १० तसेच मेडशिंगी ( सांगोला ) साठी ५ अशी ४८ ऑक्सिजन मशीन प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात येणार आहेत . या ४८ मशीनमुळे दैनंदिन २४० कोरोना रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे .

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !