श्री गणपती फार्मसीमध्ये ऑनलाइन पालक मेळावा संपन्न झाला

टेंभुर्णी,स्वराज्य वार्ता टीम

अकोले खुर्द ता. माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये प्रथम व द्वितीय वर्ष डी. फार्मसी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा आयोजित केला होता.

प्रा. स्वाती पाटील यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला, प्रा. धनश्री करंडे यांनी परिक्षेसंदर्भात सखोल माहिती सादर केली.
पालकांना व विद्यार्थ्यांना होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेबाबत माहिती देणे, ऑनलाइन शिक्षण पद्धती काय आहे व कशी आहे हे सांगणे तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करणे हा पालक मेळावा घेण्यामागचा हेतू होता. सदर मेळाव्यायामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल व ऑनलाइन वर्गासाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा देण्यात आला त्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसेच ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेबाबत व परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत पालकांना माहिती देण्यात आली.


महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी पालकांच्या सर्व शंकांचे निरासन केले आणि पालकांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. या पालक मेळाव्यातून हनुमंत बाबर यांची पालक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. सदर पालक मेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अॅड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे उपस्थित होते. प्रा. प्रशांत मिसाळ यांनी सूत्रसंचालन तर प्रा. रोहिणी गुटाळ यांनी आभार मानले.

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !