मातीतून पैसे मिळवून देणारा मित्र निनाद पाटील / जुल्कर शेख

स्वराज्य वार्ता टीम ,अकलूज

मातीत घालणारे अनेक मित्र भेटले परंतु मातीतून पैसे मिळवून देणारे मित्र म्हणून निनाद पाटील यांचे विशेष आभार नेहमीच शेतीत नवनवीन प्रयोग करणारे निमगाव ता. माळशिरस येथील उच्चशिक्षित ,प्रगतशील बागायतदार , पत्रकार व माझे मित्र निनाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2016 रोजी मी 14 /7 या अंतरावर 700 केशर आंबा लागवड केली या आंब्याच्या बागेतून यावर्षी मला खर्च वजा जाता 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला याबद्दल मी मनस्वी आनंदी आहे असे अकलूज येथील उच्चशिक्षित शेतकरी जूलकर शेख यांनी स्वराज्य वार्ता टीमशी बोलताना सांगितले.

निनाद पाटील म्हणजे शेती कामाला व्यवहाराची जोड देणारे शेतकरी आहेत. वाणिज्य शाखेचे पदवीधर असल्याने पैशाचे महत्व ते अधिक ओळखतात. आपण आंबा उत्पादक शेतकरी सगळेच त्यांच्याकडून ते शिकू व स्वावलंबी होऊ. जुलकर शेख तुमच्या धडपडीला, इच्छाशक्तीला सलाम ….!

ॲड. संजय गो.मगर , पुणे

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत माझे मित्र व मार्गदर्शक निनाद पाटील यांनी स्वतःच्या शेतात ऑटोमॅटिक इरिगेशन व फर्टिगेशन म्हणजेच संपूर्णपणे ऑटोमायझेशन चा प्रयोग सन 2014 साली केला आणि शेतीतून केळी, ऊस ,आंबा आदी पिकांच्या माध्यमातून स्वतः त्यांनी भरघोस उत्पादन घेतले आहे हे ज्ञान त्यांनी केवळ आपल्यापुरतेच न ठेवता माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना दिले आणि मी उच्चशिक्षित असूनही नोकरीच्या मागे न लागता शेती व्यवसायाशी जोडलो गेलो आणि मलाही भरघोस उत्पादन मिळू लागले आहे यामुळे शेतीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे उच्चशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत असे मला वाटते याच बरोबर आरसीएम कंपनीचे गोपीनाथ मोरे साहेब शिवामृत दूध उत्पादक संघाचे संचालक हरिश्चंद्र मगर व पत्रकार भारत मगर यांचेही विशेष आभार.

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !