कोरोना काळात प्रसार माध्यमांनी सकारात्मक होण्याची गरज : डॉ प्रकाश शिंदे

अकलूज,स्वराज्य वार्ता टीम

गेली वर्षभर जगभरातच कोरोनामुळे भयावह स्थिती आहे . बेड , ऑक्सिजन , रेमडेसिवीर उपलब्ध न होणे , डॉक्टर – नातेवाईक यांच्यात समन्वय नसणे यामुळे सगळीकडेच वातावरण भितीदायक बनले आहे . देशात व राज्यात जरी अशी स्थिती असली तरी शासन , प्रशासन व सेवाभावी संस्था त्यांच्या पातळीवर चांगले काम करीत आहेत . हे चांगले काम नागरीकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे व त्यादृष्टीने प्रसार माध्यमांनी सकारात्मक होणे गरजेचे आहे असे मत भीमा कोरेगावचे डॉ प्रकाश शिंदे यांनी व्यक्त केले .


” गडबड गप्पा ” या ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे संयोजक स्वामीराज भिसे यांनी राज्यात विविध पातळीवर काम करणाऱ्या सेवाभावी संस्था व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला . त्यावेळी डॉ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली .


डॉ शिंदे म्हणाले , कोरोना रुग्णांच्या बाबतीत डॉक्टर व नातेवाईक यांच्यात समन्वयाचा अभाव आहे . त्यामुळे रुग्णापेक्षा नातेवाईकांमध्ये मोठे घबराटीचे वातावरण आहे . त्यासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये जनसंपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक होणे गरजेचे आहे . त्यामुळे डॉक्टरांना मोकळेपणाने काम करता येइल .
या ऑनलाईन संवाद कार्यक्रमात जालना येथील मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे , कोल्हापूरच्या शिवम प्रतिष्ठानचे सोमनाथ अरनाळकर , उमेद संस्थेचे शिक्षक प्रकाश गाताडे , बारामतीच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा काटे , संगमनेरचे प्रतिक पावडे यांनी लॉकडाउनच्या काळात आपाआपल्या क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती देवून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी ऑक्सिजनची खरी गरज ओळखून किमान एक तरी झाड लावावे व भविष्यातील ऑक्सिजनची टंचाई दूर करावी . सर्दी , ताप , खोकला असे आजार झाल्यास गावातीलच दवाखान्यात प्राथमिक उपचार घेवून घरातच विलगीकरणात रहावे असे आवाहन त्यांनी केले .

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !