कुंभारगाव येथील आरोग्य उपकेंद्रास रोटरी क्लबच्या वतीने बेड आणि गाद्या

भिगवण,स्वराज्य वार्ता टीम

भिगवण रोटरी क्लब व रोटरी क्लब पुणे NIBM च्या वतीने कुंभारगाव येथील आरोग्य उपकेंद्रात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला तेथील नागरीकांच्या मागणीवरून, कोरोना रुग्णांसाठी दि. २४ रोजी पाच नवीन बेड व गाद्या देण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष संपत बंडगर यांनी दिली.

येथील ग्रामस्थांनी  कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बेडची कमतरता असल्याची बाब रोटरी क्लब भिगवणच्या पदाधिकारी यांना सांगितली. कुंभरगाव परिसरात अनेक पर्यटकांचा संबंध येत असतो, आणि त्यामुळे या परिसरात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बेड अभावी रुग्ण उपचारांपासुन वंचित राहु नये म्हणून भिगवण  रोटरी क्लब व  रोटरी क्लब पुणे NIBM यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन बेड व गाद्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यापुढील काळात  काही अडचण व मदत लागल्यास रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्व ती मदत करण्याचे अश्वासन रोटरी क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर यांनी दिले आहे.

याप्रसंगी भिगवण रोटरी क्लबचे सदस्य रणजीत भोंगळे, औदुंबर हुलगे, रियाज शेख तसेच, कुंभारगावच्या सरपंच उज्वला परदेशी, उपसरपंच उदय भोईटे, राहुल भोई व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !