इफ्तार पार्टीचे आयोजन न करता आपल्या परिसरातील गोरगरीब गरजुवंताना अन्नधान्यचे वाटप करावे/सालार पठाण

पिलीव प्रतिनिधी –
संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे.अश्या परिस्थितीत सध्या रमजान महिना सुरू असल्याने दरवर्षी विविध संघटना कडून व मुस्लिम समाजाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते परंतु या संकट काळात सोशल डिस्टन्स पाळत माळशिरस तालुका व पिलीव परिसरातील समाज बांधवांनी व इतर सामाजिक ,राजकीय संघटनांनी इफ्तार पार्टीचे आयोजन न करता सर्व बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस(अल्पसंख्याक विभागाचे) तालुकाध्यक्ष सालार पठाण यांनी केले आहे.


तसेच यानिमित्ताने समाजातील गोरगरीब गरजुवंताना अन्नधान्याचे वाटप करावे, आपापल्या घरी नमाज पठण करावे, इबादत / तिलावत करावे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मना – मनामधील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव , सदभाव , वाढविण्यासाठी हा महिना येतो.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सुखी ठेवण्यासाठी दुआ करावी या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळून शासनाच्या नियमानुसार राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सालार पठाण यांनी केले आहे.

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !