तांदूळवाडी येथे ग्रामस्तरावरील पहिले कोविड केअर सेंटर सुरू

तांदूळवाडी,स्वराज्य वार्ता टीम

राज्यभरात कोविड च्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे.रुग्णांना उपचारासाठी बेड,ऑक्सिजन ची कमतरता भासू लागली आहे.त्यामुळे आता ग्रामस्थांची सोय व्हावी यासाठी माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव,ग्रामपंचायत तांदूळवाडी व स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने ग्रामस्तरावरील पहिले कोविड केअर सेंटर हनुमान हायस्कूल येथे सुरू करण्यात आले.

सुसज्ज अश्या २५ बेड चे कोविड सेंटर चा शुभारंभ माळशिरस चे तहसीलदार जगदीश निंबाळकर, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव चे वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष माने देशमुख स्थानिक डॉक्टर मिले, डॉक्टर नीलटे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर राजू शेख, ग्रामविकास अधिकारी सावळजकर ,सुपरवायझर कदम मॅडम, सर्व आशा सेविका आणि ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य ,ग्रामस्थ यांचे उपस्थित पार पडला. सर्व ग्रामस्थांना कोणतीही लक्षण दिसल्यास ग्रामपंचायत तांदुळवाडी येथे कोरोना चाचणी तसेच विलगिकरण आणि केअर सेंटर उपलब्ध आहे तरी आपण घरात थांबून आपल्या व इतरांच्या जीवाशी खेळू नका लक्षणे असल्यास चाचणी करा असे आवाहन ग्रामपंचायत चे मार्गदर्शन ऍड.नागेश काकडे यांनी केले आहे.

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !