रमजान चे उपवास करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना कोरोना सर्वेक्षनातून वगळावे;सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

सोलापूर, स्वराज्य वार्ता न्यूज

मुस्लिम समाजातील पवित्र समजला जाणाऱ्या रमजान महिना सुरू असून यामध्ये उपवास करनाऱ्या शिक्षकांना कोरोना च्या सर्वेक्षणातून वगळावे असे निवेदन सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)जिल्हा परिषद सोलापूर यांना मेलद्वारे दिले आहे.

सध्या संपूर्ण देश कोरोना महामारी शी लढा देत आहे .अशात प्राथमिक शिक्षकांना कोरोनाचे सर्वेक्षण, लसीकरण अशी कामे दिली आहेत.यासाठी दिवसभर उन्हात फिरावे लागते.त्यामुळे रमजान चे रोजे (उपवास)करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना कोरोना सर्वेक्षणातून वगळावे असे निवेदन देऊन मागणी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे।

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !